पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
आयडीयल इंग्लिश स्कुल येथे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार सौ. माधुरी पाटणकर यांनी आपले अनुभव सांगितले, निसर्गाला जवळ करा व त्यातील रंगाची ओळख करून घ्या, मोबाईल पासून दूर रहा असाही संदेश त्यांनी यावेळी दिला. त्यांनी स्वतः यावेळी एक सुंदर असे चित्र रेखाटले त्यामध्ये रंग कसा भरला पाहिजे व कसे चित्र रेखाटले पाहिजे याचे मार्गदर्शन सौ.माधुरी पाटणकर यांनी केले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. एस .आर .पाटील मॅडम उपस्थित होत्या. संस्थेच्या संचालिका यांच्या हस्तेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण प्रदर्शनाची तयारी शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षक श्री .आर .जी. कुंभार व सर्व शिक्षकानी केली. यामध्ये पाचशे पेक्षा जास्त चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेच्या जोरावर विविध चित्र रेखाटले . कलेचे जीवनातील महत्त्व, कलेचे प्रकार तसेच विविध कला कृतीची ओळख , कलाकार घडावे हा हेतू व विद्यार्थ्यांनी रंगात खेळून कलेची जोपासना करावी याविषयीचे मार्गदर्शन कलाशिक्षक श्री.कुंभार सर यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री .आर. एस .पाटील सर व सेक्रेटरी श्री. दिपक पांडुरंग पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी मुख्याध्यापक श्री.आर.जी.कुंभार, मुख्याध्यापिका सौ .डी .एस .वंडकर मॅडम तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते .या वेळी पाहुण्यांची ओळख सौ.सुतार ए.ए. कुमारी. सकिना सनदी या विद्यार्थिनीने भाषण व सौ. पी.एस.घाटगे यांनी भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी.टी .ए .अरब यांनी केले व आभार सौ . डी . एस . वंडकर यांनी केले.