कुरुंदवाड / प्रतिनिधी
श्रद्धेच्या मार्गावर चालत असताना, हाजी दिलशाद शमशुद्दीन राऊत (वय ६४) यांनी सौदी अरेबियाच्या मदिना नगरीत अखेरचा श्वास घेतला. उमराह (हज यात्रा) करत असताना त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुटुंब, नातेवाईक आणि समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.हाजी दिलशाद शमशुद्दीन राऊत यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या कोल्हापूरचे नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट कै. अमीर इलाही लुकमान फरास यांच्या बहीण होत्या. तसेच ते मोहसीन शमशुद्दीन राऊत यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा फरास यांच्या आत्ती होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.हाजी दिलशाद राऊत यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कार्यात व्यतीत केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेक महिलांना जीवनाची दिशा मिळाली. त्यांच्या मृदू स्वभावाने, मदतीच्या हाताने आणि सहानुभूतीने त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. त्यांच्या आठवणी समाजात कायम स्मरणात राहतील.
त्यांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियामध्येच पार पाडण्यात आले.हज यात्रा करत असताना पवित्र भूमीत प्राणज्योत मालवणे हे खरोखरच नशीबवान ठरणारे आहे. इस्लाम धर्मानुसार, अशा भाग्यवान व्यक्तींना स्वर्गाचे सर्व द्वार खुले होतात.हज ही एक अत्यंत पवित्र यात्रा असून, यामध्ये प्राणत्याग करणे हे अल्लाहकडून प्राप्त विशेष कृपाच असल्याचा अनेकांनी शोक व्यक्त केला.मानली जाते.
*फोटो ओळ:- (दिलशाद राऊत)*