पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या अवघड परीक्षेत पेटवडगाव इथली मोक्षा प्रज्योत शहा या विद्यार्थिनीने यश मिळवल्याबद्दल दलित मित्र आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथली आशा प्रज्योत शहा आणि प्रज्योत शहा यांची मुलगी कुमारी मोक्षा प्रज्योत शहा हिने कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या अवघड परीक्षेत नुकताच यश संपादन केलं आहे. या परीक्षेत यश मिळवणारी पेटवडगाव शहरातील ती पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिचा सत्कार दलित मित्र डॉक्टर आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले मोक्षा हिने जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केल्याने या अवघड परीक्षेत सुद्धा तिनं यशाला गवसणी घातली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष तय्यब कुरेशी, अमोल हुक्केरी, संतोष लडगे, राजेंद्र देवस्थळी, जगन्नाथ माने, युवराज वाळवेकर, विकास कांबळे, शरद काशीद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.