पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
दिनांक 07 डिसेंबर 2024 ते 17 मार्च 2025 पर्यंत जिल्ह्यामध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये अतिजोखमीचे गट व असुरक्षित भाग / संस्था यांची क्षयरोग निदानासाठी तपासणी सर्वेक्षण व निक्षय शिबिरे घेतली जात आहेत. तसेच जनभागीदारी व कॅम्पेन ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.या मोहिमेच्या कामकाज पडताळणी करीता केंद्रीय पथकाची भेट प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे झाली. या समितीमध्ये मा. डॉ.विवेकानंद गिरी, सह संचालक सार्वजनिक आरोग्य व उप .पोर्ट आरोग्य अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,भारत सरकार हे या पथकाचे मुख्य सदस्य आहेत. तसेच जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. चेतन हांडे हे या पथकामध्ये सहभागी होते.यानंतर या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे भेट दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रूस यांनी या मोहिमेच्या कामकाजाबाबत सादरीकरण पथकासमोर केले. तसेच पथकातील सदस्यांच्या हस्ते क्षय रुग्णांना फूड बास्केट वितरण केले. साय टीबी ची टेस्ट करण्यात आली, टीबी होऊन गेलेल्या व्यक्ती म्हणजेच टीबी चॅम्पियन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सी.एच. ओ.श्री. पंकज पाटील यांनी तयार केलेली छोटीसी क्षयरोग जनजागृतीपर रील दाखवण्यात आली. या पथकाने 100 दिवसीय कामकाजाबाबत जसे मोहिमेचे नियोजन, निक्षय शिबिरे सर्वेक्षण,प्रयोगशाळा,एक्स-रे कामकाज ,कोणत्या घटकाची तपासणी केली जाते यांची पूर्ण पडताळणी केली व जनभागदारी उपक्रम याचीही पडताळणी केली. यावेळी मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधिकारी डी. टी.सी.डॉ.माधव ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद दातार, डॉ. विंदा बनसोडे श्री.राहुल शेळके,समुदाय आरोग्य अधिकारी,आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी एसटीएस/एस टी एल एस उपस्थित होते. येथील एकूण कामकाजाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.