शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्ष अस्तित्वात राहिला तर बघू असा टोला शिरोळ येथील नगरपरिषदे मधील विरोधी गटाचे नाव न घेता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज शिरोळ येथे शासकीय विश्रामगृह येथे एका बैठकीत लगावला.त्यामुळे आगामी शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच आमदार यड्रावकर यांनी शिरोळ नगरपरिषदेवर एक हाती सत्ता ठेवण्यासाठी आखणी सुरु केल्याचे दिसून आले.शिरोळ नगरपरिषदेवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे.नगर परिषदेच्या पाच वर्षे कालावधीमध्ये कोट्यावधीची विकास शहरात कामे करण्यात राजर्षी शाहू विकास आघाडीला यश आले आहे.दरम्यान नगरपरिषदेचे कामकाज करताना जागेची अडचण लक्षात घेऊन शिरोळ नगर परिषदेला शिरोळ येथील जुनी तहसील कार्यालय इमारत मिळावे यासाठी गेली चार वर्षे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी नगर परिषदेमार्फत पाठपुरावा सुरू होता.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून शिरोळ तहसील कार्यालय येथील जागा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जुन्या तहसील कार्यालयात येथील जागा ताब्यात घेऊन शिरोळ नगर परिषदेचे कामकाज सुरू होणार आहे.सदर इमारतीत विरोधी पक्षाला व पत्रकारांना स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी पत्रकारांनी केली.यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर विरोधी पक्ष अस्तित्वात असला तर बघू अन्यथा विरोधी कक्ष फुकट जाईल
असे विधान करत विरोधी गटाला थेट खुले आव्हानच आमदार यड्रावकर यांनी यावेळी दिले आहे.त्यामुळे येणारी नगरपरिषद निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले.