शिरोळ / प्रतिनिधी
श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विद्यालयाचे प्राचार्य ए ए मुल्ला यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक आर सी नाईक यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गीतातून पोवाड्यातून आणि भाषणातून शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत केला. यानंतर गावातील मुख्य मार्गावरून फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी राजे, माता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे आणि मावळ्यांच्या वेशभूषा करून तसेच धनगरी ढोल, लेझीम पथकासह उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक टी. आर. गंगधर, आर. एस. पी प्रमुख अविनाश माने, एस .डी .आरगे, आर टी कोळके, ए. डी. पुजारी, ए .व्ही .पाटील, एम. एन. पाटील, अरविंद नेर्ले, एस. डी. पाटील, जाधव ए.व्ही., एम .के. पानदारे, व्ही. ए. दाभाडे, व्ही .व्ही. पाटील,सौ एस एस पाटील तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.