सायलन्सर पुंगळ्या काढून गावभर दंगा करणाऱ्या अतिउत्साही विद्यार्थ्याना पोलिसांनी चोप देवून ३ हजार ६०० दंड वसूल केला
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
शालेय जीवनातील दहावीचा शेवटचा निरोप समारंभाच्या आनंदात मोटरसायकलच्या सायलन्सर पुंगळ्या काढून गावभर दंगा करणाऱ्या अतिउत्साही विद्यार्थ्याना पोलिसांनी चोप देवून मोटरसायकली ताब्यात घेवून ३ हजार ६०० दंड वसूल करण्यात आला .
काही दिवसानंतर दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने त्याना परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत त्यांचा शालेय जीवनातील शेवटचा दिवस म्हणून आज निरोप समारंभ शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील एका शाळेने आयोजित केला होता शिक्षण शाळेत इतर विद्यार्थ्यांना परिक्षेविषयी मार्गदर्शन करत असतानाच काही अतिउत्साही व हूशार विद्यार्थ्यांनी मोटरसायकल घेवून त्या मिस्त्रीकडे नेहरू सायलन्सर मधिल पुंगळ्या कढून त्या गावातील चौका चौकातून कर्कशा आवाज करत फिरवत असताना शिरोली पोलिसानी शिरोली फाटा येथे आडवून विद्यार्थ्याना चोप देवून त्याच्या ताब्यातील मोटरसायकल काढून घेवून पोलिस ठाण्यात नेल्या अन ३ हजार ६०० रूपये दंड करण्यात आला .