शिरोळ / प्रतिनिधी
पीएमसी छत्रपती विद्यामंदिर नंबर तीन या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये कुरुंदवाडचे प्रसिद्ध रूट कॅनाल स्पेशलिस्ट व दंतरोग तज्ञ डॉक्टर संदीप गायकवाड, शिरोळ मधील प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉक्टर शितल गवळी व शिरोळ मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली डोळे ,दात व इतर तपासणी करण्यात आली. यावेळी सदर डॉक्टरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री दीपक शिंदे , सप्तसागर, स्वाती कोळी व शैलजा कोरोचीकर यांनी गुलाब पुष्प देऊन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका जयश्री पेटकर यांनी केले. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सल्ला दिला. सुदृढ आरोग्यासाठी आहार व व्यायामाचे महत्त्व डॉक्टर अतुल पाटील यांनी पटवून दिले.विद्यार्थ्यांना दाताचे आरोग्य कसे राखावे याबाबत डॉक्टर संदीप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डोळ्यांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन डॉक्टर शितल गवळी यांनी विद्यार्थ्यांनी केले. शेवटी आभार अध्यापिका सविता जाधव यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी अध्यापिका शशिकला पाटील, यशवंत कांबळे, महंमद कादरभाई हे शिक्षक वृंद व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सदर शिबिरास गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी, विस्ताराधिकारी श्री दीपक कामत व केंद्रप्रमुख श्री अण्णा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.