कुरुंदवाड / प्रतिनिधी
दत्तवाड, ता.शिरोळ येथील मलिकवाड रस्त्यावर एका शेतातील बंद खोलीत जुगार खेळताना नऊ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी 42 हजार,900 रुपये रोख रक्कम, 8 हजार,500 रुपये किमतीचे तीन मोबाईल हॅन्डसेट असा 51 हजार,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तवाड येथे अवैध जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाळत ठेवून पोलिसांनी बंद खोलीत छापा टाकला असता जुगार खेळताना श्रीधर परशराम न्हावी (वय 34), शुभम आण्णासाहेब पाटील (वय 28, दोघे रा. सौंदती, ता. रायबाग, जि. बेळगाव), सलीम दस्तगीर पेंढारी (वय 47, रा. चिक्कोडी, ता. चिक्कोडी), संतोष राजू चंपू (वय 24), लक्ष्मण आण्णा चंपू (वय 28, रा. सौंदत्ती, ता. रायबाग, जि. बेळगाव), मारुती शंकर सनदी (वय 36, रा. वडगुल, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), शाम राजेंद्र सुतार (वय 30), सुधाकर आण्णासो पाटील (वय 49), नावल धोंडीराम कांबळे (वय 30) आणि उदय काकासो पाटील (तिघे रा. दत्तवाड, ता. शिरोळ) यांना अटक केली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सागर पवार,पोलीस कॉन्स्टेबल पोपट ऐवळे,सागर खाडे,फारूक जमादार,शिरीष कांबळे, राजेंद्र पवार,ज्ञानदेव सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.