पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
१०० दिवस क्षयरोग मोहीमेचा एक भाग म्हणून क्षयरोग कार्यक्रमातील नवीन बदल, नोटीफिकेशन,अत्याधुनिक क्षयरोग निदान व उपचार प्रणाली,साय-टीबी, क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (टी.पी.टी.), इत्यादीची माहिती खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांचे पर्यंत पोहचवण्याचा उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सन २०२५ अखेर क्षयमुक्त भारत करण्यात खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांचे मोलाचे योगदान राहील असे मत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांनी खाजगी वैद्यकीय तज्ञ व खाजगी औषध विक्रते कार्यशाळेत मार्गदशन करत असताना मांडले जिल्हा क्षयरोग केंद्र ,कोल्हापूर, आरोग्य विभाग पंचायत समिती कार्यालय हातकणंगले, मेडीकल असोसिएशन,फार्मसीस्ट असोसिएशन, यांच्या सहकार्याने स्मॅक असोसिएशन हॉल पुलाची शिरोली येथे खाजगी वैद्यकीय तज्ञ व खाजगी औषध विक्रते यांची कार्यशाळा (सी.एम.ई.) पार पडली,यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांना सर्व निदान झालेल्या क्षयरुगणांचे नोटीफिकेशन करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्व रुग्णांना शासकीय योजना व सुविधा जास्तीत जास्त देण्यात याव्यात असे आवाहन अध्यक्षीय भाषणात खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांना केले.
या कार्यशाळेस ६९ डॉक्टर्स उपस्थित होते..सूत्रसंचालन डॉ.पंकज पाटील यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रूस यांनी मानले.. स्मॅक असोसिएशन चे चे अध्यक्ष श्री राजू पाटील व सुवर्ण मोह्त्सवी अध्यक्ष श्री.सुरेंद्र जैन यांचा निक्षय मित्र होउन किट दिल्या बद्दल सत्कार करण्यात आला.हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.प्रसाद दातार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की खाजगी वैद्यकीय डॉक्टरांचे आम्हांस राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नेहमीच सहकार्य असते व येथुन पुढे ही चांगल्या प्रकारे मिळेल याची खात्री आहे.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांनी नोटीफिकेशन,अत्याधुनिक क्षयरोग निदान व उपचार प्रणाली,साय-टीबी, क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (टी.पी.टी.), पोषण आहार योजना, खाजगी वैद्यकीय व्यवसायिंकांना प्रोत्साहनपर भत्ता, निक्षय मित्र,टी.बी. केअर,प्रीझम्टीव्ह नोंदणी,निक्षय प्रणाली याबाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुद्ध पिंपळे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.प्रसाद दातार, वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रूस, स्मॅक असोसिएशन चे चे अध्यक्ष श्री राजू पाटील व सुवर्ण मोह्त्सवी अध्यक्ष श्री.सुरेंद्र जैन,शिरोली मेडीकल असोसिएशन चे डॉ.निनल मणियार, शिरोली केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष श्री बाजीराव पाटील, हातकणंगले केमिस्ट असोसिएशनचे श्री.मोळे,रुकडी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. देशमुख,बाळासाहेब पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ.गुडेडे,डॉ.महेश्वरी मिरजकर , डॉ.पंकज पाटील ,महादेव गायकवाड, प्रशांत घोलपे संजय पुजारी,,माया जगताप,अवधूत मेंडके,शिवानंद कोरबु,,एकनाथ पाटील,विजय प्रधान, ओकार जाधव परिसरातील खाजगी डॉक्टर्स व मान्यवर उपस्थित होते.