इचलकरंजी शहरात पुन्हा दहशद,टोळी युद्धाने शहर हादरले

इचलकरंजी शहरातील वेताळपेठ गांधी कॅम्प व मोठे तळे येथील पवार गल्ली मध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन एक गंभीर जखमी तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.यामध्ये पवार गल्ली मधील दोन रिक्षा २ दुचाकी व  सायकलची जमावाकडून तोडफोड महिलांना शिवीगाळ  व मारहाण करण्यात आली आहे.या दहशतीमुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे. टोळक्याने लाटी काट्या घेऊन वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले आहे.या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे
इचलकरंजी शहरांमध्ये पुन्हा टोळी युद्ध सुरू झाले आहे.शहरातील वेताळपेठ गांधी कॅम्प व मोठे तळे वरील पवार गल्ली मध्ये दोन युवकांमध्ये काही दिवसापासून वादावादीचा प्रकार झाला होता.हा वादावादीचा प्रकार काल हाणामारीत घडला यातील वेताळ पेटीतील राहणारा रोहन पारसे याच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्याच्यावर कोयत्याने वार केला होता. त्याच्या डोक्यामध्ये गंभीर इजा झाली होती. त्याला त्याच्या मित्रांनी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला सांगली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे याची माहिती रोहन फारसे याच्या मित्रांना मिळताच  त्याच्या मित्रांनी मोठे तळे येथिल पवार गल्लीमध्ये सुमारे 40 ते 50 जणांनी येऊन हेरवाडे यांच्या दरवाज्या समोर लावलेल्या दोन रिक्षा दोन टू व्हीलर सायकलची मोठी तोडफोड केली आहे.तिथेच असणाऱ्या हेरवाडे यांची गाडी फोडत असताना त्यांच्या शेजार्यांनी अडवले असता व त्यांच्या घरातील त्यांची आई मुलगी पत्नीला टोळक्याने त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली व त्यांच्या दोन रिक्षा फोडण्यात आल्या.यावेळी येथे राहणारे शेजारी प्रमोद शिंदे व प्रकाश शिंदे यांनाही टोळक्यांनी मारहाण केली.पवार गल्लीमध्ये दहशतीचे वातावरण टोळक्याने केले होते याची माहिती पोलिसांना मिळताच  घटनास्थळी पोलिसांनी येऊन 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत.यातील रोहन पारसे याला पहिल्यांदा मारहाण केली. त्या

नंतर त्याच्या मित्रांनी मोठे येथील पवार गल्लीमध्ये येऊन दहशत माजवून हेरवाडे परिवाराच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये पुन्हा खून मारामारी टोळी युद्ध सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Spread the love
error: Content is protected !!