शिरोळ / प्रतिनिधी
धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये मौजे आगर येथील सेल्फ डिफेन्स कराटे अकाडमीमधील रितेश रावसाहेब नांरगीकर, १४ वर्षाखालील मुले ,गटात प्रथम क्रमांक व मुलीमध्ये मानसी महादेव मोरे, घालवाड,१४ वर्षी खालील गटात प्रथम क्रमांक, पटकाविला या दोघांची पंजाब येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ,सना पैगंबर मुल्ला हिनेही या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला या सर्व खेळाडूंना सेल्फ डिफेन्स कराटे अकाडमीचे अध्यक्ष गिरीश कोळी सेन्साई,प्रशिक्षक सुनिल कांबळे,गौरव पाटील,दिपक माने,ओंकार मोरे याचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.