धरणगुत्ती / संभाजी जाधव
धरणगुती येथे परवा उभा ऊस पेटला.संबंधीत शेतकऱ्याचे नुकसान झाले.घटना अतिशय दुर्दैवी आहे .
गळीत हंगाम चालू झाला कि उस पेटण्याचे आणि पेटवण्याचे प्रकार होतात,त्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र धरणगुती येथे उस पेटण्याच्या दुर्देवी घटनेवर आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे.हे त्याहून दुर्दैवी आहे.स्वःताच्या राजकारणासाठी कोणी एखाद्या गावाचीच आशा प्रकारे बदनामी करत असेल.तर सुज्ञ नागरीकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे.समाज माध्यमातील बातम्या आणि घेतलेली माहिती यांत विसंगती आहे.आगीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.शिरोळ पोलीस तपास करून सत्य समोर आणतील,यात शंका नाही,यापूर्वी गावातील चेन स्नॅकिंग, चोऱ्या,ग्रामदेवतेच्या मंदीरात झालेली मूर्तीची विटंबना आणि चोरी आदी घटनांचा शिरोळ पोलीस अद्याप तपास करत आहेत.या आगीच्या प्रकरणाचाही छडा लावण्यात पोलीस कसलीही कसर ठेवणार नाहीत.परवाचा ऊस पेटण्याचा दुर्दैवी प्रकार संतापजनक आहे.मात्र माध्यमांनी याची बातमी करताना आमदार यड्रावकरांच्या समर्थकांचा ऊस पेटला (किंवा पेटवला) अशी बातमी दिली.ते त्याहून संतापजनक आहे.उसाला लागलेली आग आणि त्यातून झालेले त्या शेतकऱ्याचे नुकसान हे तो शेतकरी म्हणून कोणाचाही समर्थक असला तरी ते सारखेच असते आशा प्रकारातून झालेले नुकसान हे आपद्ग्रस्त शेतकरी कोणाचा समर्थक आहे.यावर ठरत नाही मात्र धरणगुत्तीत लागलेल्या त्या उसाच्या आगीवर कोणीतरी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.त्याला शेतकरी आणि ग्रामस्थांनी बळी पडू नये.पोलीस तपासात उसाच्या आगीचे खरे कारण स्पष्ट होईल.किमान तो पर्यंत तरी ग्रामस्थांनी आशा आगलाव्यांवर विश्वास ठेवू नये अशी अपेक्षा येथील सुज्ञ नागरीकांतून व्यक्त केली जात आहे.