राजकीय द्वेषातून धरणगुत्तीत साडेतीन एकरातील ऊस पेटवला 

धरणगुत्तीत साडेतीन एकरातील ऊस पेटवला

जयसिंगपूर / प्रतिनिधी

धरणगुत्ती (ता. शिरोळ): आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक संजय पाटील यांचा साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस राजकीय द्वेषातून जाळला असल्याचा आरोप केला आहे. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि गावातील राजकीय समीकरणे यामुळे हा कट रचण्यात आला असावा, असा त्यांचा संशय आहे.
धरणगुत्ती गावात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस पेटविला.
संजय पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांचे गावातील कोणाबरोबरही व्यक्तिगत वैर नाही. मात्र अज्ञात लोकांनी राजकीय दुश्मनीतूनच हा डाव रचला आहे, असा आरोप पाटील यांनी केला. घटनेनंतर संजय पाटील यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऊस जळण्याचे कारण लवकरच स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.या आगीत संजय पाटील यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राजकीय द्वेषातून उभे पिक जाळणे म्हणजे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
शिरोळ तालुका हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे. मात्र, राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याचा उभा पीक जाळणे हे तालुक्याला अशोभनीय आहे. शिरोळ तालुक्याच्या इतिहासात इतकी राजकीय चुरस झाली मात्र,शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नुकसान पोहोचवण्याचे धाडस कुणीही केले नव्हते. धरणगुत्ती येथे घडलेल्या घटनेमुळे द्वेषाच्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली ही घटना तालुक्याच्या पुरोगामी विचाराला तिलांजली देणारी आहे.संजय पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून यामागील दोषींना कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण घटनेवर गावकऱ्यांनी घटनेनंतर संपूर्ण गावाचे लक्ष या प्रकरणावर केंद्रीत झाले असून पोलिस तपासातून सत्य उघड होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

Spread the love
error: Content is protected !!