सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड केले आहे.यावेळी पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे म्हणाले हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून आरोपींच्या कडून प्रथमदर्शनी माहिती घेतली असता आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून केल्याचे कबुली दिली आहे.संशयित आरोपी हे सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले.यातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
वर्तवली.