कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप चौकात सलगर सदलगा राज्य महामार्गावर पाईपलाईन लिकेज होऊन मोठे भगदाड पडले आहे.पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे.अंदाज लागत नसल्याने अपघात होत आहेत.या ठिकाणाहून कुरुंदवाड नगरपरिषद इचलकरंजी महापालिका आणि शिरढोण ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गेल्या आहेत. तिन्ही प्रशासन आमचे लिकेज नाही असे सांगत एकमेकांवर ढकला-ढकली करत आहेत.आता हे लिकेज कोण काढणार असा सवाल शहरवासियातून उपस्थित होत आहे.दरम्यान या लिकेज बाबत प्रशासन जबाबदारी घेत नसेल तर कृष्णा पाणी योजनेच्या ठिकाणाहून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी दिला आहे.लिकेजबाबत नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेला सांगितले असता ते आमचे लिकेज नाही असे सांगतात तर शिरढोण ग्रामपंचायत देखील असेच सांगत आहे.तर कुरुंदवाड नगरपरिषद देखील उडवून लावत आहे.हे तिन्ही प्रशासन जबाबदारी घेत नसेल तर पाईप-लाईन लिकेज कोणाची?असा सवाल उपस्थित होत आहे. कुरुंदवाड पालिका प्रशासनाने तर जबाबदारी झटकून चालणार नाही असे नागरिक बोलत आहेत.तिन्ही प्रशासनांनी एकत्रित येऊन या लिकेज बाबत कार्यवाही केली नाही तर दोन्ही गावच्या कृष्णा पाणी योजनेचा पुरवठा बंद करून जॅकवेलला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शहर प्रमुख सावगावे यांनी दिला आहे.