कुरुंदवाड / प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्यांचे काम प्रशंसनीय आहे.दिव्यांगाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली आहे.या मंत्रालयाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत पाच टक्के दिव्यांग निधीची तरतूद करण्यात आली आहे.शासनाच्या प्रत्येक योजनेत दिव्यांगांना प्रथम स्थान दिले जाणार असल्याने दिव्यांगाना जगण्याचा आधार व बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे यांनी केले.
कुरुंदवाड येथील पालिकेच्या तबक उद्यान हॉल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाच टक्के निधीच्या 221 लाभार्थींना अनुदान वितरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमातकार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे बोलत होत्या. कर निरीक्षक स्नेहल सोनाळकर,बांधकाम अभियंता ऋतुजा चौगुले,लेखापाल सविता खोत,अतिश काटकर,शिवमाला भोसले,माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर,प्रहार संघटनेचे सुधाकर तावदारे आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना कार्यालय निरीक्षक वळवडे म्हणाल्या दिव्यांग बंधूंना पाच टक्के निधीतच न ठेवता पंतप्रधान आवास घरकुल योजना,दिव्यांग व्यावसायिक योजनासह आदी पालिकेच्या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.लाभार्थींनी या योजनांचाही लाभ घ्यावा असे सांगितले.यावेळी माझी नगराध्यक्ष मालवेकर आयुब पट्टेकरी, प्रसाद माने, अन्वर बारगीर, बांधकाम अभियंता ऋतुजा चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली.यावेळी लाभार्थींना अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभाचा धनादेश वाटप करण्यात आला.यावेळी संजय पाटील, तानाजी शिकलगार,दत्ता कडोलीकर, बाबासाहेब गावडे, नंदकुमार लोखंडे,सादिक बारगीर, श्रावण मोरस्कर यांच्यासह दिव्यांग महिला भगिनी उपस्थित होत्या.