अब्दुललाट / प्रतिनिधी
अब्दुललाट ता.शिरोळ येथे रहाते घरात कोणी नसल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील बेडरूमधील लोखडी तिजोरीचे कुलूप कशाने तरी उचकटुन 1लाख 50 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले.या चोरीची फिर्याद पुरुषोत्तम गणेश कुलकर्णी रा.गणेश हॉस्पीटल, अब्दुललाट ता.शिरोळ यांनी आज कुरुंदवाड पोलीसात दिली आहे.अब्दुललाट येथील डॉ.पुरूषोत्तम कुलकर्णी यांच्या हॉस्पिटल मधील राहत्या घरात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरच्या कालावधीत त्यांच्या घरी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील बेडरूमधील लोखंडी तिजोरीचा दरवाजा कशाने तरी उचकटून,सोन्याचे मनी मंगळसूत्र, साखळी,बांगड्या असा 1 लाख, 50 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.