खिद्रापूर ता.शिरोळ येथे देवदर्शन करून परतत असताना दरम्यानच्या सैनिक टाकळी रस्त्यावर दुचाकी मोपेडचा अपघात होऊन एक महाविद्यालयीन युवती जागीच ठार
झाली तर एक गंभीर जखमी झाली आहे.इव्हेजनील बाळासाहेब जिरगे वय.20 रा.गेस्ट हाऊस पाठीमागे,चाकूर,ता.चाकूर,जि.लातूरनअसे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे तर कविता श्रीशैल माळी वय 24 ,रा.माडग्याळ ता.जत,जि. सांगली असे जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे.हा अपघात आज मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मिरज येथील गुलाबराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थिनी देव दर्शनासाठी खिद्रापूरला गेल्या होत्या.मयत इव्हेजनील जिरगे व कविता माळी या दोघी आपल्या मैत्रिणींसह सुझुकी एक्सेस लाल रंगाची मोपेड क्र एम.एच.10 सी.जे.7028 वरून मिरजेकडे परत निघाल्या असता,खिद्रापूर दरम्यानच्या सैनिक टाकळी रस्त्यावर दिलीप कुगे यांच्या दुकानाजवळ प्रकाश रायनाडे यांच्या शेतासमोर आल्या असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेच्या दगडाला जोराची धडक बसल्याने इव्हेजनील जिरगे याच्या डोक्याला मार लागल्याने ती जागीच ठार झाली. तर कविता माळी ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.