जय हनुमान संघाच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब जत्राटे तर उपाध्यक्षपदी अरुण पाटोळे यांची बिनविरोध निवड
इंगळी ता चिकोडी येथील जय हनुमान क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.यावेळी संघाच्या नूतन अध्यक्षपदी आप्पासाहेब दत्तू जत्राटे यांची तर उपाध्यक्षपदी अरुण वसंत पाटोळे
यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी एस.आर.कांबळे यांनी केली करण्यात आली.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्य व्यवस्थापक कुमार पाटील यांनी केले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांचा
संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नूतन अध्यक्ष अप्पासाहेब जत्राटे बोलताना म्हणाले स्वर्गीय संस्थापक विष्णुपंत जाधव यांनी सहकारी संस्था राजकारण विरहित व सभासदांच्या हितासाठी त्याचा कसा उपयोग होईल या तत्त्वावरच मी संघाचा प्रगतीसाठी
सर्वच संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संघाचा पारदर्शक कारभार व संघाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहील असे सांगितले.यावेळी संचालक श्रीपती जाधव,शंकर पवार,मोहन बामणे, सुकुमार शिंदे, बाळासाहेब आवटी ,परशुराम माने, नंदकुमार घाटगे,
रामगोंडा आलतगे ,रवी शिरहट्टी ,सतीश बन्ने, सौ मालुताई धाबडे, श्रीमती पुष्पा चौगुले, कल्लाप्पा कांबळे, यांच्या ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिरगुप्पी शाखाचे अध्यक्ष प्रकाश जाधव
,उपाध्यक्ष दादा कोंडके, पाटील शिवाजी शिंदे,राजू घाटगे ,सुरेश गायकवाड,चंद्रकांत जाधव, संजय काटकर अजित माने, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.