‘लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम २०२४’चा शुभारंभ

लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या ४०व्या स्मृतिदिनानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “काळजी आरोग्याची, आपल्या माणसांची” या भावनेतून सुरू असलेल्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम २०२४’चा शुभारंभ आज कृष्णा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते बोरगाव येथे संपन्न झाला. त्यांनी कोविडच्या काळात सर्व सामान्य जनतेची उत्तम सेवा केली.गेली अनेक वर्षे हजारो रुग्णांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करून विविध शस्त्रक्रिया मोफत करण्याचे काम राजारामबापू पाटील साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून होत आहे. यंदाच्या वर्षी अनेक तज्ञ डॉक्टर एकाच छताखाली रुग्णांना सेवा व मोफत औषधोपचार देण्याचे कार्य करत आहेत.या उपक्रमाबद्दल राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Spread the love
error: Content is protected !!