हिट अँड रन कायद्यात विरोधात स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू
शिरोळ तालुका वाहन चालक मालक संघ संघटनेचा निर्णय
शिरोळ / प्रतिनिधी
केंद्र सरकारने जो “हिट अँड रन” हा काळा कायदा वाहन चालकांच्या विरोधात लागू करण्याचे ठरवलेले आहे तो कायदा प्रामाणिक व्यावसायीक वाहन चालकांवर अन्यायकारक आहे.व्यावसायीक वाहन चालक यांच्या कौटुबिक तसेच आर्थिक परिस्थितीचा विचार करुण नवीन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्याचे निवेदन शिरोळ तालूका मोटार चालक मालक संघटेनेच्या वतीने तहसिल कार्यालयाचे अव्वल कारकून शब्बीर मोमीन यांना देण्यात आले.
महामार्गावर कोणतीही दूर्घटना झालेस चालक घटना स्थळावरून पसार झालेस रू. सात लाख रूपये दंड व १० वर्षे कारावास हा नियम चालक व वाहन मालक या दोघांना मान्य नाही.सदर अपघातास चालक व वाहन मालक या दोघांनाही तितकाच जबाबदार धरण्यात येत आहे.
अपघात आणि घातपात यात फरक आहे. याची सरकारला जाणीव ठेवावी. सदर “हिट अँड रन चा कायदा रद्द करण्यात यावा सदरच्या कायद्याला संविधानीक मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी शिरोळ तालुका वाहन चालक-मालक संघटनेच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो पर्यंत ड्रायव्हर सुरक्षा कायदा अस्तित्वात
येत नाही तसेच हिट अँड रन” या कायद्यामध्ये बदल करुण शिथीलता जाहिर करण्यात येत नाही तोपर्यंत आज बुधवार दि.१० जानेवारी २०२४ पासून स्टेअरींग छोडो आंदोलन करण्याचे आवाहन केलेले आहे.शिरोळ तालुका वाहन चालक-मालक संघटनेचे सर्व सदस विना
परवाना रस्त्यावर उतरून मोर्चा,आंदोलन करणे तसेच कायद्याचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती करण्यास सक्त मनाई करण्यात आहे.तरी देखील आमच्या संस्था/संघटनेच्या नावाचा कोणी गैरवापर करुण काही गैरकृत्य करत आसेल/ करील तर शिरोळ तालुका वाहन चालक
मालक संघटना त्यास जबाबदार असणार नाही याची महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी यावेळी वाहन चालक मालक संघटनेचे प्रविण ऐनापुरे,संदेश एवरट्टी,जयसिंग पाटील, अभिजित पाटील,अमित पाटील,इस्माईल दानवाडे,
अमोल बजनवाडे,राजू मोरे,महावीर माने,अनिल माने , विलास शिंदे,रामभाऊ पाटील,दत्ता गावडे,आसिफ लाटकर,किशोर चव्हाण,महेश शिंगाडे,सुरज जाधव, प्रतिक टारे,संतोष आळीकट्टी,मनोज मांजरे,बंडू उपाध्ये ,
अतुल गवळी,रवी सानमाडपी,अकबर मुजावर,रोहित माळवदे,राहुल वडेर,महावीर नाईक,शितल चौगुले,सागर भोजणे यांच्यासह शिरोळ तालूका चालक मालक संघनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या उपस्थित होते.