राजेंद्र सुतार यांची दे.भ.रत्नाप्पा कुंभार कोल्हापूर जनता बाजार संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोलीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय सुतार • यांची देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कोल्हापूर जनता सेंट्रल को-ऑप कंझ्यूमर स्टोअर्स लि. (जनता बाजार) च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली.
या संस्थेची सन २०२५-२०३० ची पंचवार्षिक निवड आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांचे कट्टर समर्थक असलेले राजू सुतार यांना पुलाची शिरोलीतून पहिल्यांदाच संधी मिळाली. या निवडीसाठी आमदार सतेज पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर शशिकांत खवरे, कोल्हापूर शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण , उत्तम पाटील, शिवाजी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.ही निवड बिनविरोध होतात पुलाची शिरोली येथील शशिकांत खवरे यांचे कट्टर समर्थकांनी जल्लोष करत राजेंद्र सुतार यांची विजयी रॅली करण्यात आली ही रॅली शिरोली फाटा येथून ग्रामपंचायत पर्यंत काढण्यात आली ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या निवडी प्रसंगी मानसिंग गावडे, नाना उलपे, शिवाजी पाटील, प्रल्हाद खोत, अतुल शिंदे, कपील सावंत , ग्रामपंचायत सदस्य शक्ती यादव , माजी ग्रामपंचायत सदस्य सरदार मुल्ला ,प्रल्हाद खवरे ,राजू पांगरे,आदी उपस्थित होते. राजेंद्र सुतार यांच्यावर पुलाची शिरोली मध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love
error: Content is protected !!