कोल्हापूर / प्रतिनिधी
शासकीय परिपत्रकानुसार जयसिंगपूर येथील शासकीय जागेवर श्री शिवाजी हौसिंग सोसायटी जयसिंगपूर मध्ये मागासवर्गीय सभासद करून भूखंड देण्यात यावा यासाठी तारकेश्वर महादेव गायकवाड यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा भूखंड जाणीवपूर्वक दिलेला नाही. त्यासाठी संबंधित सोसायटीवर कारवाई व्हावी ही मागणी घेऊन आदिनाथ गोंडाजी यांनी आज गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. आदिनाथ गौंडाजे यांच्या लाक्षणिक उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश संघटक मोबीन मुल्ला यांनी आज गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता भेट दिली व पाठिंबा दिला.यावेळी मोबीन मुल्ला म्हणाले शासकीय नियमानुसार मागासवर्गीय आरक्षित जागा ही भरलीच पाहिजे मागासवर्गीयांना त्यांचे हक्क दिलेच पाहिजेत” संविधानात तरतूद असताना देखील जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय हे दलित व मागासवर्गीय व्यक्तीवर अन्याय अत्याचार करतात याची दखल कोण घेणार? सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल जर घेतली नाही तर आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असून सदर आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील अशी ग्वाही आम्ही संबंधित आंदोलन करताना दिलेली आहे.यावेळी नारी अत्याचार निवारण समितीच्या प्रदेशाध्यक्ष गजाला मुल्ला,शहराध्यक्ष रिजवान चिकोडे, तारकेश्वर गायकवाड व उपोषणकर्ते आदिनाथ गोंडाजे उपस्थित होते.