कोल्हापूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील शासकीय जागेवर असणारी श्री शिवाजी हौसिंग सोसायटी जयसिंगपूर मध्ये शासनाच्या नियमानुसार 20 टक्के मागासवर्गीय सभासद करून भूखंड पूर्तता करून इतर भूखंड देण्याच्या निर्णय असून देखील तारकेश्वर महादेव गायकवाड यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा भूखंड जाणीवपूर्वक दिलेला नाही. त्यासाठी संबंधित श्री शिवाजी हौसिंग सोसायटी व त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिनाथ गोंडाजी यांनी आज गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले असल्याची माहिती आज गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता आदिनाथ गौडाजे यांनी दिली आहे.