उत्सवाच्या मुख्य दिवशी धार्मिक सोहळा उत्साहात दर्शनासाठी भाविकांची रीघ
शिरोळ / प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त धार्मिक सोहळा अमाप उत्साहात संपन्न होत आहे.श्री बुवाफन महाराज उत्सवाचा आज मुख्य दिवस
श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या गजरात शिरोळ नगरपरिषद आणि उत्सव व उरुस संयोजन समितीच्यावतीने मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात
श्री बुवाफन महाराज यांच्या समाधी स्थळास मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला.मंदिरात दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती.सोमवारपासून श्री बुवाफन
महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसाची सुरुवात झाली मंगळवार श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस यामुळे मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली
होती.श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिन श्री बुवाफन महाराज की जय श्री शंभूआप्पा महाराज की जयच्या गजरात गलिफ नारळाचे तोरण नैवेद्य धूप अगरबत्ती कापूर अर्पण करून
भाविकांनी श्री बुवाफन महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.शिरोळ नगरपरिषद व श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीच्यावतीने
मानाच्या गलेफाची बँड पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि शोभेच्या दारूची आतिषबाजी करत नगरपरिषदेपासून श्री बुवाफन महाराज मंदिरापर्यंत शाही मिरवणूकीने मंदिरात मानाचा
गलिफ अर्पण करण्यात आला.यावेळी दलितमित्र डॉ अशोकराव माने व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते पालिकेचे प्रशासक
निशिकांत प्रचंडराव,माजी आमदार उल्हास पाटील,युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,दत्तचे संचालक दरगु गावडे,माजी गजानन संकपाळ,गोरखनाथ माने,माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा
पाटील,माजी नगरसेवक तातोबा पाटील,इम्रान अत्तार,विठ्ठल पाटील,श्रीवर्धन माने-देशमुख,दादासो कोळी,शरद उर्फ बापूसो मोरे,प्रकाश गावडे,प्रदीप चव्हाण,दयानंद जाधव,रावसाहेब
देसाई,विराजसिंह यादव,विजय आरगे,जनार्दन कांबळे, अमरसिंह शिंदे,निळकंठ उर्फ पिंटू फल्ले,विजय माने- देशमुख,रामदास गावडे,शिवाजीराव चव्हाण,रणजीत पाटील,
धनाजी पाटील-नरदेकर,अविनाश उर्फ पांडुरंग माने,रामचंद्र पाटील,प्रकाश माळी,मोहन माने,प्रतीक धर्माधिकारी,ओंकार माने-गावडे,उदय संकपाळ,रुपेश मोरे,दिगंबर जाधव,नेताजी
जाधव,अमोल हिरेमठ,रावसाहेब माने,दत्तात्रय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक भोजने,बबन बन्ने,हैदर मेस्त्री,जब्बार मेस्त्री, चंद्रकांत भाट,बाळासाहेब कांबळे,शक्तीजीत गुरव,महेश काळे,
सागर भाट यांच्यासह हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या जयघोषात श्री बुवाफन महाराज यांच्या समाधीस आणि श्री शंभूआप्पा महाराज की जयच्या
गजरात शंभूआप्पा महाराजांच्या समाधीस मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला.