श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसा निमित्त आयोजित स्पर्धा उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त मंगळवारी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या सायकल स्पर्धेत पुरुष गटात निहाल नदाफ व महिला गटात योगेश्वरी कदम मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुष गटात प्रवीण कांबळे महिला गटात वैभवी कुंभार हातगाडा स्पर्धेत जय शिवराय मंडळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
मंगळवारी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील अर्जुनवाड रस्त्यावर महिला व पुरुष गटाची मॅरेथॉन महिला व पुरुष गटाची सायकल व हातगाडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या . या स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला प्रथमता मॅरेथॉन त्यानंतर हातगाडा व सायकल स्पर्धा पार पडली विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड आणि चषक पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .
सायकल स्पर्धा पुरुष गट – निहाल नदाफ (प्रथम), वरद शिंदे (द्वितीय), सोहेल बारगीर (तृतीय) , सायकल स्पर्धा महिला गट- योगेश्वरी कदम (प्रथम), प्राजक्ता सूर्यवंशी (द्वितीय), समृद्धी कुंभोजे (तृतीय) ,मॅरेथॉन पुरुष गट – प्रवीण कांबळे – सांगली (प्रथम), दशरथ घुगरे – सांगली (द्वितीय), सतीश सलगर – सांगली (तृतीय) , महिला मॅरेथॉन स्पर्धा – वैभवी कुंभार – उमळवाड (प्रथम) , देवयानी लायकर – इचलकरंजी (द्वितीय), केतकी बावडेकर – शिरोळ (तृतीय), हातगाडा स्पर्धा – जय शिवराय मंडळ शिरोळ (प्रथम) , बाळूमामा ग्रुप रुकडी (द्वितीय), विजय माने (तृतीय) ,यांनी या स्पर्धेत अनुक्रमे यश मिळवले .
सोमवारी झालेल्या व्हाँलीबॉल स्पर्धेत – येलूर व्हाँलीबॉल संघ (प्रथम) ,दानवाड व्हाँलीबॉल संघ (द्वितीय) ,कोरेगाव व्हाँलीबॉल संघ (तृतीय),रांगोळी स्पर्धा महिला गट – प्राजक्ता गणेश साळुंखे – जयसिंगपूर (प्रथम),मिताली बाबुराव सुतार – वाळवा (द्वितीय), मनीषा सतीश टेंबुगडे- जयसिंगपूर( तृतीय), मानसी पांडुरंग जाधव – शिरोळ (चतुर्थ) ,राजश्री विनोद पाटील -शिरोळ (उत्तेजनार्थ) ,रांगोळी स्पर्धा पुरुष गट- सुरेश मलगोंडा छत्रे- अकिवाट(प्रथम), अभिजीत शिवाजी सूर्यवंशी – इस्लामपूर (द्वितीय),विकास निळकंठ गायकवाड – वारणा कडोली तृतीय.मोटरसायकलबरोबर रेडकू पळविणे -मारुती गवळी – मिरज(प्रथम),संजय गवळी -मिरज(द्वितीय), आप्पा हराळी- मिरज (तृतीय), गणेश पवार – कोल्हापूर (चतुर्थ) ,प्रणव धारे – मिरज उत्तेजनार्थ.
मोटारसायकलबरोबर म्हैस पळवणे स्पर्धा- विनायक पवार – कोल्हापूर (प्रथम) , संजय दिनकर तोरस्कर- कोल्हापूर (द्वितीय) ,सज्जाद समीर महाबली – मिरज (तृतीय) ,साईराज सरनाईक – कोल्हापूर(चतुर्थ ),सुरेंद्र वारे मिरज उत्तेजनार्थ.
रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर बक्षीस वितरण व सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यानंतर लावण्य चंद्रा लावणी सांस्कृतिक व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती .
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस साजरा करण्यासाठी उत्सव व उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव ,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे ,यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे ,उपाध्यक्ष संतोष विटेकरी ,खजिनदार राहुल कोळी ,सचिव किरण जगताप ,ऑडिटर पिराजी जयान्नावर ,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे ,कार्याध्यक्ष संतोष घाडगे , संयोजक लखन कुंभार , सहसंयोजक सागर कांबळे ,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे ,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी ,सहखजिनदार कुमार जयान्नावर , नितीन कोळी , सहऑडिटर प्रताप जगदाळे, सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत .