वडगाव फाटा मार्गावर टेम्पोची दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे वडगाव ते वडगाव फाटा मार्गावर निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हिदायतुल्ला दस्तगीर हजारी (वय ५१) असे जखमीचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर जखमीला कोणतीही मदत न करता टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : हिदायतुल्ला दस्तगीर हजारी हे आपल्या दुचाकीवरून वडगाव ते … Read more

मुलीला फोन केल्याचा जाब विचारल्याने वडिलांवर जीवघेणा हल्ला

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे मुलीला वारंवार फोन का करतोस ? असा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी मिळून मुलीच्या वडिलांनाच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या घटनेमूळे हालोंडी (ता. हातकणंगले) येथे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अविनाश भाऊसो पाटील (वय ४१) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादनुसार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रणव अण्णासो पाटील, … Read more

शिरोली पुलाचीतील कुस्ती दंगलीत वैभव मानेची बाजी; महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटीलला दिले आसमान

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली पुलाची येथील श्री काशिलिंग बिरदेव, म्हसोबा यात्रा तसेच पीर अहमदसो व बालेचांदसो उरुसानिमित्त आयोजित भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार पडली. शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने झालेल्या या दंगलीत पुणे येथील मल्ल वैभव माने याने सांगलीच्या महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील याला घुटना डावावर शानदार चितपट करत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचा … Read more

उपक्रमशीलतेतून घडलेले यश : ‘ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल’चा ग्रामीण शिक्षणात आदर्श प्रवास

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि संस्कारयुक्त शिक्षण देणे हे अनेक संस्थांसाठी आव्हानात्मक ठरते. मात्र जिद्द, नियोजन आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते,याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल’.अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत या शाळेने शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत ग्रामीण भागात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला … Read more

पुलाची शिरोलीत विकासाची झेप: अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांपासून ‘मॉडेल गाव’कडे दमदार वाटचाल

१५ वा वित्त आयोग, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांतून कोट्यवधींची कामे पूर्ण; पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाला अभूतपूर्व चालना पुलाची शिरोली / कुबेर हंकारे  गावाचा सर्वांगीण विकास केवळ घोषणा आणि आश्वासनांवर होत नाही, तर नियोजनबद्ध अंमलबजावणी, पारदर्शक निधी वापर आणि लोकप्रतिनिधींच्या प्रामाणिक इच्छाशक्तीवर तो अवलंबून असतो.याच तत्त्वावर पुलाची शिरोली गावाने गेल्या काही वर्षांत … Read more

भक्तांच्या हाकेला धावणारे शिरोलीचे ग्रामदैवत काशिलिंग बिरदेव 

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे साधारणपणे २०० ते २२५ वर्षापूर्वीची हकिकत आहे. सध्या आपण ज्याला हाळ म्हणून ओळखतो, तो पंचगंगा नदीकाठच्या अग्नेय दिशेस असणाटा भाग. पूर्वी बरीच वस्ती असलेला भाग. जुन्या काळी महापुरातून जी माणसे वाचली, त्यांनी जी वस्ती वसवली, त्या भागात झोपड्या बांधूनच ते राहिले. काही दिवसांनी म्हणजेच १८५० च्या सुमारास अचानक आग लागून … Read more

सर्वदूर पोहचली शिरोलीच्या सर्वेश्वर महादेवाची कीर्ती

सर्वदूर पोहचली शिरोलीच्या सर्वेश्वर महादेवाची कीर्ती   पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हुंकारे  गावातील लोकांत भक्ती वाढविण्यासाठी कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसाद करण्यास सुरुवात केली. कालांतराने महाप्रसादाचा मान हुवाळे व शिरगावकर घराण्याकडे आला. महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन घराण्यांमार्फत जोशी यांच्या घरी महाप्रसादाचे साहित्य दिले जाते. सन १८०३ मध्ये शिरोली गावाच्या पश्चिमेला सखल नावाच्या शेतवडीत म्हणजेच … Read more

पुलाची शिरोलीत पीर बाबा उरूस परंपरा आजही जिवंत; शेकडो वर्षांची परंपरा

पुलाची शिरोलीत पीर बाबा उरूस परंपरा आजही जिवंत शेकडो वर्षांची परंपरा; पंचगंगा तीरावर उरूसाला हजारो भाविकांची उपस्थिती   पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली गावातील पीर बाबा उरूस हा धार्मिक सलोखा, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम म्हणून आजही जपला जात आहे. सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या उरूसाला ऐतिहासिक आणि धार्मिक … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे आरोग्य सभापतींची आढावा बैठक संपन्न

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे नुकतीच जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवनिर्वाचित बांधकाम व आरोग्य सभापती मा.सौ.सारिका नांदेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान सभापती नांदेकर यांनी आरोग्य केंद्राची सखोल पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली.बैठकीच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रयूज यांनी प्रास्ताविकात आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा मांडला.त्यांनी केंद्रांतर्गत … Read more

दत्तवाड परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; वृक्ष उन्मळल्याने वाहतूक विस्कळीत,वीजपुरवठाही खंडित

महावितरणण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे रात्रीत वीजपुरवठा सुरळीत;, ग्रामस्थांकडून कौतुक ​दत्तवाड / हेरवाड दत्तवाड आणि हेरवाड परिसरात गुरुवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ताशी ४० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत … Read more