बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन पाटील गणेशोत्सव उत्साह सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार; विविध क्षेत्रातील गुणवंत सभासदांचा सत्कार

Spread the love

बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन पाटील
गणेशोत्सव उत्साह सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार; विविध क्षेत्रातील गुणवंत सभासदांचा सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी

येथील बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ (राजवाडा)च्या सन २०२६-२७ सालच्या अध्यक्षपदी रोहन बाळासाहेब पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाची वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आगामी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रोहन पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मंडळाच्या सभासद तसेच खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बाल शिवाजी मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ३५ वर्षांपासून मंडळाचे सभासद, कार्यकर्ते, महिला कलाकार व बाल कलाकार सजीव देखाव्यांमध्ये सहभागी होत आहेत. या माध्यमातून धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक आणि प्रबोधनपर संदेश देण्याचा मंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. उत्कृष्ट कलाविष्कारामुळे मंडळाला विविध सामाजिक संस्थांकडून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.शिरोळ शहर पत्रकार संघ व शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘गणराया अवॉर्ड’ मंडळाने यापूर्वी सलग तीन वर्षे दोन वेळा पटकावला आहे. तसेच गेली दोन वर्षे मंडळाने या पुरस्कारातील प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा बहुमान मिळविला आहे. यंदाही ‘गणराया अवॉर्ड’ मिळविण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.बैठकीस अध्यक्ष रावसाहेब देसाई, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील, सचिव आण्णासाहेब गावडे, बाळासाहेब गावडे, माजी सरपंच गजानन संकपाळ, राजू साळवी, भालचंद्र ठोंबरे, संदीप चुडमुंगे, अमित संकपाळ, चंद्रकांत गावडे, दीपक पाटील, नरेंद्र माने, ज्ञानेश्वर पाटील, मनोज जाधव यांच्यासह मंडळाचे सभासद, खेळाडू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!