म्हैशाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आंदोलन अंकुश संघटनेचा गौरव

कनवाड / प्रतिनिधी  कनवाड गावातील म्हैशाळ बंधाऱ्याच्या बांधकामामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते.या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने तीव्र आंदोलन उभे केले. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यश आले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कनवाड गावातील बाधित शेतकऱ्यांकडून सोमवारी सायंकाळी दर्गा चौकात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार … Read more

कासारवाडीत जागेच्या वादातून दोन गटांत हाणामारी ; परस्परविरोधी तक्रारी दाखल

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे जागेच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण १८ जणांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले असून पहिल्या फिर्यादीत प्रविण नामदेव खोत (वय ४१, रा. कासारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ मे रोजी सायंकाळी … Read more

तालुकास्तरीय समितीकडून पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या विकासकामांची पाहणी

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला भेट देत विविध विकासकामांची सविस्तर पाहणी केली. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष तपासणी करून कामांचा दर्जा, अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा समितीने घेतला.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्या नेतृत्वाखाली ही समिती पुलाची शिरोली … Read more

गांजा विक्री करणाऱ्यास अटक, १ किलो ७० ग्रॅम गांजा, दुचाकी , मोबाईल असा ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  शिरोली औद्योगिक वसाहतीतील जाफरानी काट्याजवळ बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास शिरोली पोलिसांनी पकडून त्याच्याकडून १ किलो ७० ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संशयितास पोलिसानी ताब्यात घेतले.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि शिरोली येथील रविकांत सर्जेराव गाडेकर (वय ३३, रा. विलासनगर, … Read more

माध्यमिक विद्यालय विलासनगर, शाळेचा दहावीचा मराठी माध्यमाचा ९७ टक्के तर सेमी माध्यमाचा १०० % निकाल

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय विलासनगर शाळेने दहावी परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शाळेच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के तर मराठी माध्यमाचा ९७.१ टक्के निकाल लागला असून नंदिनी लक्ष्मण आतकरे हिने ९०.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक , ओम बबन तावडे … Read more

शिरोली येथे अवैध मावा विक्री पान शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ५,९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, सुपारी आणि अवैध मावा विक्री करणाऱ्या एका पान शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोहेल रुस्तुम मकानदार (वय २९, रा. सावित्री कॉलनी, यादववाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या … Read more

प्रा.आ. केंद्र शिरोली (पु.) येथे जि.प. सदस्यांची सदिच्छा भेट

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली (पु.) येथे जिल्हा परिषद सदस्य व जनआरोग्य समिती अध्यक्ष सलीम महात तसेच जि.प. सदस्य हेरले जनआरोग्य समितीचे सहअध्यक्ष अतिश शिंगे यांनी सदिच्छा भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली.भेटीदरम्यान दोन्ही जि.प. सदस्यांनी … Read more

विना क्लास दहावीमध्ये ‘सेंच्युरी’; ऋजुता पाटीलचे घवघवीत यश

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे आजच्या स्पर्धात्मक युगात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग, ऑनलाइन मार्गदर्शन आणि विविध कोचिंग क्लासेस जवळपास अनिवार्य मानले जात असताना न्यू पॅलेस परिसरातील कु. ऋजुता पाटील हिने मात्र केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.कोणत्याही प्रकारचा क्लास अथवा खासगी शिकवणी न लावता तिने मिळवलेले … Read more

अभ्यासू व आक्रमक व्यक्तिमत्त्व हरपले; नारायण मोरे यांचे निधन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथील शेती, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नारायण गुंडा मोरे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नारायण मोरे हे अभ्यासू विचारांचे ठाम पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात … Read more

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी

कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण; शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा आदर्श कोथळी / प्रतिनिधी  कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी आणि दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांचा सुपुत्र अप्रतिम रविराज ऐवळे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून तब्बल 90.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासचा आधार … Read more