शिरोली येथे अवैध मावा विक्री पान शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ५,९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, सुपारी आणि अवैध मावा विक्री करणाऱ्या एका पान शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोहेल रुस्तुम मकानदार (वय २९, रा. सावित्री कॉलनी, यादववाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिरोली फाटा ते सांगली फाटा दरम्यान असलेल्या सर्व्हिस रोडवरील द पान शॉपमध्ये अवैध पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी या पान शॉपवर छापा टाकून कातरलेली सुपारी ४,५०० रुपये किमतीची १ किलोची ९ पाकिटे , सुगंधी तंबाखू ३०० रुपये किमतीची ३००० नंबरी पत्तीची अर्धा किलोची पाकिटे , तयार माव्याच्या पुड्या १,१२५ रुपये किमतीच्या एकूण ४५ पुड्या प्रति पुडी २५ रुपये असा ५,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . मकानदार याने कोणत्याही प्रकारचे वैधानिक इशारे किंवा लेबल नसलेला, आरोग्यास घातक असा सुगंधी तंबाखू व मावा तयार करून विक्री करत असल्याप्रकरणी याबाबतची फिर्याद महेश बाळासो आंबी स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र शामराव कोळी आणि महेश बाळासो आंबी यांच्या पथकाने केली. पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!