पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय विलासनगर शाळेने दहावी परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शाळेच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के तर मराठी माध्यमाचा ९७.१ टक्के निकाल लागला असून नंदिनी लक्ष्मण आतकरे हिने ९०.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक , ओम बबन तावडे याने ९०.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर मयुरेश शंकर वाळके याने ८९.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच धनश्री मल्लाप्पा बिदरभावीकर हिने ८८.६० टक्के तर श्रुतिका केशव पाटील हिने ८८.०७ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सातत्याने घेतलेले परिश्रम, नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास यामुळे हा उत्कृष्ट निकाल लागल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.या यशस्वी निकालाबद्दल संस्थापक एस. एन. पाटील, सचिव सौ. माधवी पाटील, संस्था अध्यक्ष डॉ. मनोजकुमार सदाशिव पाटील, उपाध्यक्ष महेश सदाशिव पाटील, तज्ज्ञ संचालिका सौ. प्रतिभा मनोजकुमार पाटील तसेच सौ. आरती महेशकुमार पाटील , प्राथमिक मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पांडुरंग वाकरेकर, मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री राकेश डोईफोड तसेच वर्गशिक्षक श्री. विजय माणिक शेटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .