शिरोळ / प्रतिनिधी
लाटवाडी ता.शिरोळ येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कन्या विद्या मंदिर नं.२च्या मुलींनी समूहनृत्य -द्वितीय तर कथाकथनमध्ये कु.अविन्या वीरसेन पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या सुयशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.या मुलींना धनाजी आवळे,वहिदा मुल्ला,राजश्री टोणे,सतिश नलवडे, दीपमाला कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तर गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी
दिपक कामत,केंद्रप्रमुख अण्णा मुंडे,मुख्याध्यापक नूर महंमद मुल्ला,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुजाता पाटील,उपाध्यक्ष धनंजय नाईक व सदस्य,पालक यांचे प्रोत्साहन लाभले.