अब्दुल लाट गावाला कळू द्या कोण “आका” कोण “बोका” कॉम्रेड आप्पा पाटील

अब्दूल लाट / प्रतिनिधी

 

अब्दुल लाट मधील गावकरी होवू घातलेल्या सौर ऊर्जा project बद्दल अजुनही अनभिज्ञ आहेत.बर्‍याच गावकऱ्यांना गंध ही नाही की आपल्या गावची १० एकर जमीन कोणा व्यावसायिकाला ३० वर्षे स्वाधीन केली आहेत याची माहिती अब्दुललाट ग्रामपंचायत प्रशासनाने आज दिवसभरात विशेष गावसभा  कधी घेणार हे जाहीर करावे अन्यथा मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल तसेच गावाला कळू द्या कोण “आका” कोण “बोका” असा इशारा  कॉम्रेड आप्पा पाटील यांनी आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दिला आहे.अब्दुल लाट,हरोली व कोथळी या तीन गावात सौर ऊर्जा निर्माण हा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे.मात्र अब्दूल लाट व कोथळी गावाने याला विरोध केला आहे.कोथळीतील जागरूक नागरिकांनी मोजणीच्या वेळीच हे प्रकरण हाणून पाडले आहेत.तर अब्दूल लाट व हरोली दोन गावात प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहे.मेघा इंजिनिअरिंग या कंपनीकडून हा प्रोजेक्ट केला जात आहे.ही तीच कंपनी electrol बॉन्डच्या यादीत या कंपनीचे नाव होते.प्रोजेक्ट गावच्या भल्यासाठी आहे असे जे म्हणतायत त्यांनी पुरेशा आकडेवारी सहित मांडणी करत नाही आहेत.मोघम शब्द वापरून गुंगारा देत आहेत.दिवसा वीज मिळणार २४ तास वीज पुरवठा होणार असे काहीसे बोलत आहेत.
[ विचार करायला लावणारे महत्वाचे मुद्दे ]
गावातील आत्ता विजेचा वापर आणि तयार होणारा वीज याचे नेमके गणित काय?,तयार झालेला विज महावितरणला विकल्यानंतर,परत अब्दुल लाट सबस्टेशनसाठी 24 तास वीज ऊपलब्ध करून द्यायला महावितरणने तसे काही नियोजन केले आहेत का?,अब्दुल लाट substation मध्ये लाटवाडीचा समावेश आहे.तर २४ तास वीज लाटवाडीला देखील उपलब्ध होणार का?,मोफत वीज देणार असाल तर व्यावसायिक नफा कशातून मिळवणार आहे?, १० एकर गायरान जागा भविष्यात आणखीन महत्त्वाच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो,तरूणांना व्यवसाय, पुरग्रस्तांसाठ, मेंढपाळांना (धनगर ) चराऊ जमिन म्हणुन भविष्यातील अब्दुललाट नगरपरिषदेच्या राखीव जागा असणे आवश्यक आहे.
Spread the love
error: Content is protected !!