इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरामध्ये बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महसूल प्रशासनाने कारवाई करून त्याच्यावर लाखो रुपयाचा दंड केला आहे.शासनाचा महसूल बुडवून विना रॉयल्टी हा ट्रक वाळू विकण्यासाठी इचलकरंजी शहरात आला असता त्याच्यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई महसूल प्रशासनातील अधिकारी तलाठी केली आहे.
इचलकरंजी शहरामध्ये सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.नदीतील काळी वाळू सध्या मिळत नसल्यामुळे वाळूमाफिया चोरून नदीतून वाळू उपसा करत आहेत. त्याची विक्री करण्यासाठी शहरांमध्ये एक ट्रक येणार असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांना मिळाली होती त्यांनी हा ट्रक शहरात आला असता त्याच्याकडे ही वाळू कुठून आणली रॉयल्टी भरली आहे का अशी विचारणा केल्यास यावेळी गाडीवरील ड्रायव्हरने उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक जप्त करून सध्या याच्यावर कारवाई केली आहे.या ट्रकमध्ये नदीतील काळी वाळू मोठ्या प्रमाणात आणली होती.शासनाचा महसूल बुडवून ही वाळू आणल्याचे निष्पन्न झाले आहे.सध्या नदीमध्ये उपसा बंदी वाळू असल्यामुळे काळी वाळू कुठून आणली याची माहिती सध्या महसूल प्रशासनाचे अधिकारी घेत आहेत.तसेच हा ट्रक जप्त करून यातील वाळू हि जप्त करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी तलाठी व सर्कल यांनी या वाळू मालकाला लाखो रुपयाचा दंड केला आहे.यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.