इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे 11 वे जिल्हा अधिवेशन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी येथे पक्षाच्या राज्य कमिटीच्या निरीक्षणाखाली उत्साहाने संपन्न झाले,सकाळी 11 वाजता कॉम्रेड दत्ता माने यांच्या हस्ते झेंडावंदन झाले त्यानंतर अधिवेशनाचे स्वागत प्रास्ताविक कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले आणि अधिवेशनाचे कामकाज करण्यासाठी सुभाष जाधव, भरमा कांबळे आणि चंद्रकला मगदूम या तीन लोकांचे अध्यक्षीय मंडळाची घोषणा केली,प्रारंभी अध्यक्षीय मंडळाचे वतीने श्रद्धांजलीचा ठराव मांडला आणि अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनील मालुसरे म्हणाले आज देशात आरएसएस आणि भाजपचे सरकार गेली 10 वर्षे राज्य करीत आहे, मात्र देश प्रचंड कर्जबाजारी झाला आहे. देशावरील कर्जाचा बोजा तिप्पट वाढला आहे.कोविड काळापासून देशातील अनेक उद्योग बंद पाडून कोट्यावधी कामगारांना बेरोजगार केले आहे.आज भाजपाला विरोध करायची ताकद फक्त कम्युनिष्ठ पक्षातच आहे.2023 च्या पक्ष अधिवेशनात भाजपला रोखायचा निर्णय आपल्या पक्षाने घेतला होता त्याला अनुसरून देशभर इंडिया आघाडीचा प्रयोग कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या मार्फत राबविण्यात आला आणि त्याला बऱ्यापैकी यश देखील आले,म्हणून येणाऱ्या मदुराई येथील अधिवेशनात पुन्हा एकदा देशातील राजकारणाला काय कलाटणी द्यायची याचा निर्णय होणार आहे, त्यासाठी आपल्या कार्यकर्ते यांनी भाजपच्या धर्मांध आणि जातीयवादी राजकारणाला विरोध करण्यासाठी तयार रहावे व पक्ष बळकट करावा असे आवाहन करण्यात आले.