सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी

सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या
सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश,चार पैकी चारही जागा काँग्रेसने मोठ्या फरकाने जिंकल्या.दोन जागेवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला एक ही जागा जिंकता आली नाही.बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात सर्वात मोठी असणाऱ्या सदलगा नगरपालिकेच्या चार प्रभागातील पोटनिवडणुकीमध्ये एकूण नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवली.त्यापैकी प्रभाग क्रमांक 15 मध्ये रियाना सनदी या 604 मतांनी विजयी झाल्या,एकूण 784 मता पैकी करिष्मा मुजावर यांना 170 व नोटा मते 10 याप्रमाणे मत विभागणी पंधरा प्रभाग क्रमांका मध्ये झाली.प्रभाग क्रमांक 05 मध्ये एकूण मतदान 780 झाले,त्यापैकी विजयी उमेदवार आताऊल्ला मुजावर यांना 512 मते, हुसेन मकानदार यांना 60 मते मोहसीन सनदी यांना 201 मिळाली. 05 मते नोटाला मिळाली.प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण मतदान 607 त्यापैकी विजयी उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांना 379 तर महानतेंस देसाई यांना 253 मते मिळाली आणि 05 मते नोटाला मिळाली.प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण 589 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी विजयी उमेदवार शकुंतला कुंभार यांना 398 मते मिळाली, तर रशिया जमादार यांना 186 मते मिळाली व नोटा ला 05 मते मिळाली.याप्रमाणे सदलगा शहरातील नगरपालिकेमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरगोस यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजपला दोन पैकी एकही जागा मिळवता आली नाही.शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे व जोशाचे वातावरण पसरले आहे एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या विजयने चिकोडी- सदलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांचे सदलगा शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चित्र दिसत आहे.
Spread the love
error: Content is protected !!