पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पुजेचा मान हा गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पुजा प्रथम करतो.हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे.पुलाची शिरोली येथील जय गणेश तरूण मंडळाचा गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधीनी साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजता विधीवत ‘श्री’ चा महाअभिषेक करण्यात आला.दुपारी १२ वाजता गणेश जन्मकळ साजरा करण्यात त्यावेळी महिलांनी पाळणा गीते गायली,सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती.गणेश मंदिराचा या वर्षी जिर्णेद्धार करण्यात आला असून मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई भव्यमंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.गणेश भक्तांनी जास्वंदीची फुले,दूर्वाचे हार गणेशमुर्तीची आकर्षक पूजा हे आजच्या गणेश जयंतीचे वैशिष्ट्य ठरले.मंदिरात गणेश जन्मकाळ सोहळ्यावेळी गणपतीची महाआरतीने गणेश जयंती साजरी केली जाते. या निमित्त जय गणेश मंदिर व्यवस्तापनाने नेटके नियोजन केले होते.महाप्रसादाचे नियोजन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले होते.तसेच स्वर साधना गीत मंच कोल्हापूर यांनी सादर केलेली मराठी भावगीत,भक्तीगीतांचा सुरेल संस्कृतीक कार्यक्रम पार पडला.यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे व माजी सरपंच पंडित खवरे यांच्या हस्ते महाआरती व जन्मकाळ सोहळा पार पडला.यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच सौ.पद्मजा करपे,उपसरपंच बाजीराव पाटील,माजी उपसरपंच कृष्णात करपे,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड,निलेश कांबळे,पोलीस कर्मच्यारी,ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, सदस्या, सदस्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष गणेश पाटील,उपाध्यक्ष बाजीराव खवरे, सर्जेराव खवरे,बंडा लंबे,अशोक पाटील,रवि खवरे,श्रीधर पुजारी,विजय खवरे,सुनिल कोळी , वै
भव खवरे,गणेश खवरे,विनायक पेटकर विनायक पाटील व मंडळाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.