शिरोली ब्रह्मकुमारी विद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे.देशातील 70 टक्के जनता खेड्यात राहते यामुळे शेती आणि शेतकरी जगाला तर देश जगेल त्यासाठी योगीक शेती करणे अत्यावश्यक आहे असं मत ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या शारदा बहेनजी यांनी व्यक्त केले त्या पुलाची शिरोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.पुलाची शिरोली येथील ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या ग्रामविकास प्रभागाकडून राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला शेतकरी हा कष्टकरी राजा जगाचा अन्नदाता पोशिंदा आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने शेतकऱ्याच्या शेतीतील बांधा बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच ब्रह्मकुमारीच्या हॉलमध्ये शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना राजयोगिनी शारदा बहेनजी म्हणाल्या भारत हा देश कृषी प्रधान देश आहे.देशातील 70 टक्के लोक खेड्यामध्ये राहतात त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.जो आज पर्यंत आत्म्याचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणे शक्य नाही शेतकऱ्यांच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे हरितक्रांती करण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा वाढवल्याने उत्पन्न वाढले पण अति रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम ही जाणवू लागले.जन्मजात आजारपण आला लोकांचे आयुष्य कमी झालं.माणसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गेल्या 82 वर्षापासून योगीक शेतीसाठी विविध उपाय योजना अमलात आणून जागृती करत आहे.रासायनिक शेतीला फाटा देऊन पूर्वीप्रमाणे नैसर्गिक योगीक शेतीकडे शेतकऱ्यांनी वर्ण गरजेचं आहे.शेतकऱ्यांची महिमा करत पिकांना आपल्या भावना असतात पिकासी कसे बोलायचे असते परमेश्वराकडून शक्ती घेऊन त्या पिकांना व धरणी मातेला कशी पोहोचवता येतात तसेच योगीकशेतीचे महत्व सांगून योग द्वारा शक्तीचे आदान प्रदान करण्यासाठी विधी सांगितली त्याचबरोबर इंचलकरंजीचे आलेल्या बाळासाहेब रुगे यांनी आपण करत असलेल्या योगीक शेतीच्या उत्पादनातील वाढ आलेल्या मालाची प्रत कशी वाढवायची सेंद्रिय युरिया सेंद्रिय डीएपी बीजाअमृत कसे बनवायचे याचे मार्गदर्शन केले प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपल्या परिवारासाठी किमान दोन ते पाच गुंठे योगीक शेती करण्याचा आव्हान केले तसेच या कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी उदय पाटील नारायण मोरे,प्रकाश कौदाडे,सौ पुष्पा पाटील,नितीन चव्हाण, धनाजी पाटील,अशोक आकाराम पाटील,सागर खटाळे,अरुण पाटील,अंबपचे अशोक माळी,नकुल कौंदाडे ,विनायक पाटील ,नामदेव पाटील,हिंदूराव कौंदाडे,शामराव खवरे,निवृत्ती कुभार,बाळासो गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन ब्रह्मकुमार प्रल्हाद भाई अमृता कौंदाडे वंदना आंबी मानसिंग भाई सयाजी भाई यांनी केले

Spread the love
error: Content is protected !!