शिरोळ / प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र राज्यातील सामाजिक वातावरण दुषित करणारे व अनुसूचित जाती जातीमध्ये भांडणे लावून देणारे एस सी आरक्षण उपवर्गीकरण हटाव व आरक्षण,संविधान बचाव विषयी संपूर्ण ५९ जातींच्या पैकी शिरोळ तालुक्यात असलेल्या जाती पैकी प्रमुख नेते यांची बैठक पार पडली. बैठकीत मातंग समाजला उपवर्गीकरण करून फायदा होणार नाही उलट नुकसान होणार आहे असे मत प्रत्येक नेत्यांनी व्यक्त केले. बैठकीचे प्रमुख सतीश भंडारे म्हणाले कि,मातंग समाज अर्थिक शैक्षणिक दृष्टीने सक्षम, करायचा असेल तर वस्ताद लहुजी साळवे मातंग आयोगाने केलेल्या शिफारशी तात्काळ लागू करावीत.लोक शाहीर आण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत प्रत्येक मातंग तरुणाला विनाअट फक्त जातीच्या दाखल्यावर २५ लाख रूपये. कर्ज द्यावे. म्हणजे उपवर्गीकरण करण्याची गरज पडणार नाही. मातंग समाजातील ४ नेत्यांना पुढे करून भाजप, आर, एस, एस, चे सरकार संविधान व आरक्षण सहजासहजी बदलता येत नाही म्हणून उपवर्गीकरण करून दलित जाती जातीत द्वेष निर्माण करून भांडणे लावून देण्याचा प्रयत्न करीत आहे.संविधानाच्या रक्षणासाठी बौद्ध , दलित समाजातील लोक नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात. मनुवादी सरकारचा प्रयत्न सफल होऊ देत नाही. त्यामुळे बौद्ध व मातंग या एससीमधील ताकदवान व संख्येने मोठे असणारी समाजामध्ये बौध्दांनी सर्व आरक्षण खाल्ले असे वादग्रस्त विचार मातंग समाजातील त्या ४ नेत्यांमध्ये पेरून टाकले. व आरक्षण उपवर्गीकरण करा अशी मागणी केली. आज संपूर्ण सोशल मीडियावर फक्त महार मांग भांडणे चालू आहे. पण गावपातळीवर असे चित्र नाही कारण समाजाने हा राजकीय डाव ओळखला आहे. १३% जागेत स्पर्धा करुन मातंग समाजातील मुले शिकत आहेत. नोकरी मिळवत आहेत. १/३%जागा मागून बाकीच्या ९८% मातंग समाजातील मुलांचे भवितव्य काय आहे व बाकीच्या ५८ जाती या उपवर्गीकरणला विरोध करत आहेत. तरीही मनुवादी सरकारचा निर्णय झाला तर लक्षात घ्या संविधान नष्ट करण्यासाठीच व दलितांना उधवस्त करणेसाठीच हा डाव आहे व आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू व हा डाव उधळून टाकू असा इशारा भंडारे यांनी दिला.यावेळी बैठक संयोजक ऍड. शितल कांबळे यांनी कायदेशीर प्रक्रिया कशी आहे व उपवर्गीकरण करून ५९ जातींचे कसे नुकसान होणार आहे याची माहिती दिली.
सुनील कांबळे( दाढी) यांनी उपवर्गीकरणला कडाडून विरोध केला. कुरुंदवाडचे जेष्ठ नेते आण्णाप्पा आवळे पै. शरद कोरेे, प्रमोद सुवासे, बाबुराव ऐवाळे, सुनील कांबळे जैनापूर, कृपादान तिवडे, राहुल कांबळे. कांतिनाथ कांबळे, आकाश कुरणे, सागर देसाई, प्रकाश बिडकर, अनिल ठोमके, पुंडलिक ठोमके, विजय खाटिक, निवास कांबळे, मिथुन कांबळे, शंकर देशमुख जाॅन ऐवाळे आदी उपस्थित होते.