पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभा विविध सामाजिक, प्रशासकीय आणि स्थानिक मुद्द्यांवरून कमालीची तापली. गावातील कथित लव्ह जिहाद आणि महिला अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, संबंधित आरोपींना आणि अशा प्रवृत्तींना गावात कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी जोरदार मागणी सकल हिंदू समाज व ग्रामस्थांनी केली.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मजा कृष्णात करपे होत्या. सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांनी विषयांचे वाचन केले.या ग्रामसभेत कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा,अतिक्रमण आणि क्रीडा संकुल उभारणी यांसारख्या अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली.काही दिवसांपूर्वी गावात घडलेल्या अत्यंत गंभीर व दुर्दैवी घटनेमुळे शिरोली पुलाची गावातील शांतता व सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. संबंधित प्रकरणामध्ये आरोपींनी पीडित मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ तयार केल्याची निंदनीय बाब समोर आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी व जनजागृती करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी केली . गावातील कथित बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी ही अभिजीत कोळी यांनी केली, तर परप्रांतीय भाडेकरूंच्या कुटुंबांच्या कागदपत्रांची कडक पडताळणी करण्याची मागणी संभाजी भोसले यांनी लावून धरली.ग्रामसभेमध्ये गावातील शांतता, सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेसाठी अनेक ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले यामध्ये गावात पुन्हा असे विष कालवून शांतता भंग होऊ नये, यासाठी संबंधित धर्मांध जिहादी युवकांना गावात कायमची बंदी करावी. व या घटनेमागील मुख्य सूत्रधार कोण आहे यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि गावात असे काही जाळे रॅकेट कार्यरत आहे का याचा पोलिसांनी संपूर्ण तपास करावा. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची गावात पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही, याची प्रशासनाने कडक काळजी घ्यावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. तसेच आरोपींना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही . ग्रामपंचायत पुलाची शिरोली यांनी स्वतः या प्रकरणासाठी सक्षम, अनुभवी आणि अशा गुन्ह्यांमधील तज्ज्ञ स्पेशालिस्ट वकील नियुक्त करावा. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कमाल शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत व पाठपुरावा ग्रामपंचायतीने करावा.भविष्यात अशा प्रकारचे वर्तन घडू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रबोधन करावे जर येथून पुढे असा प्रकार घडल्यास व उघडकीस आल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहणार असून या युवकांना कायमस्वरूपी आद्य पार करावी अशी मागणी योगेश खाडे यांनी केली व या मागणीला तात्काळ ग्रामसभेने मंजुरी दिली. गावातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी तातडीने महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी.शेतजमिनीलगतच्या गायरान क्षेत्रात उभारण्यात आलेल्या मोठ्या गोडाऊनमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असून, हे अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. गावठाणातीलअतिक्रमणांबाबत प्रशासनाने स्पष्ट नियम जाहीर करावेत, असे संभाजी गायकवाड म्हणाले.खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे सांगत ते हटवण्याची मागणी सरिता मानकापूरे यांनी केली. यावर बोलताना सरपंच करपे यांनी, खाजगी कॅमेऱ्यांची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी अधिकृत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे स्पष्ट केले. मकाजी पाटील मळा परिसरातील रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था तातडीने सुधारण्याची मागणी माजी सरपंच विठ्ठल पाटील व मंदार पाटील यांनी केली. ग्रामपंचायतीकडून तक्रारींची पोहोच मिळत नसल्याची खंत सुनिता माने यांनी व्यक्त केली, तर भानुदास माळी यांनी नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याची मागणी केली.
फुलाची शिरोली येथील गाव तलाठी मंडळ अधिकारी ग्रामस्थांची कोणतीही कामे वेळेत करत असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली या मागणीचा ठराव ग्रामसभेने तात्काळ मंजूर केला.शेतकऱ्यांच्या शेती लगत असणाऱ्या गायरान जागेत मोठ-मोठी गोडाऊन बांधून अतिक्रमणे केली आहे त्यामुळे शेती पिके काढणे अडचणीचे होत आहे त्यासाठी ही अतिक्रमणे काढावीत अशी मागणी राजू पाटील यांनी केली.या वादळी चर्चेदरम्यान गावासाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णयही समोर आला. पुलाची शिरोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अमोल पाटील व श्रीधर पाटील यांनी मांडला होता. यासाठी सुरुवातीला २५ एकर जागेची मागणी करण्यात आली होती; परंतु प्रशासनाकडून यासाठी तब्बल ५४ एकर अखंड माळ रानाची जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभेत देण्यात आली. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.यावेळी ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती सदस्या कमल कौंदाडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, बाजीराव पाटील, महंमद महात, आरिफ सर्जेखान, सुजाता पाटील, मनिषा संकपाळ, रजिया देसाई उपस्थित होते. तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, शक्ती यादव, कृष्णात करपे, प्रकाश कौंदाडे, प्रशांत कागले, बाळासाहेब पाटील, संपत संकपाळ, बाबासाहेब बुधले,धनाजी पाटील, संजय पाटील , हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रशांत पाटील , किसन पुजारी, विशाल खोचेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.