१ जूनपासून श्री.ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मान्यवरांचे होणार प्रवचन व कीर्तन
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ येथे अधिक मासानिमित्त समस्त वारकरी सांप्रदायाच्यावतीने सोमवार दि.१ जून ते रविवार दि.७ जून २०२६ या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने काकडा आरती,भजन, प्रवचन,कीर्तन,जागर भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री हनुमान मंदिर गावडे गल्ले येथे ७ दिवस श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या कालावधीमध्ये काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, कीर्तन, हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी सकाळी सात वाजता ह.भ.प.आप्पासो पुजारी आणि सर्व वासकर वारकरी सांप्रदाय यांच्या उपस्थितीत विणापूजन होणार आहे. यानंतर श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, नगरसेवक ओंकार गावडे, सचिन शिंदे, निलेश गावडे, शाहू वाचनालयाचे संचालक आनंदराव माने देशमुख यांच्या हस्ते ध्वजपूजन होणार आहे.सोमवार १ जून रोजी विठूमाऊली भजनी मंडळ शिरोळ यांचे भजन, ह.भ.प. सागर दिलीप राडे (मर्दवाडी) यांचे प्रवचन, ह.भ.प. भिकाजी शिंदे (कासारवाडी) यांचे कीर्तन, श्रीहरी भजनी मंडळ शिरढोण यांचे जागरभजन होणार आहे. मंगळवार २ जून रोजी सद्गुरु सेवा भजनी मंडळ उचगाव यांचे भजन, ह.भ प. बाळकृष्ण मुळे (सांगली) यांचे प्रवचन, ह.भ.प. सागर चव्हाण (माळखांबी) यांचे कीर्तन, आम्ही भजनवेडे ग्रुप कुरुंदवाड यांचे जागरभजन होणार आहे. बुधवार ३ जून रोजी माऊली भजनी मंडळ शिरोळ यांचे भजन, ह.भ.प. प.पू. वासुदेवानंद सरस्वती तथा इंद्रजीत देशमुख यांचे प्रवचन, ह.भ.प. श्रीगुरु प्रभुराज वासकर महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन, एकता भजनी मंडळ शिरोळ यांचे जागरभजन होणार आहे. गुरुवार ४ जून रोजी श्री. संत सेना महाराज भजनी मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांचे भजन, ह.भ.प. भीमराव खटावे (शिंदेवाडी) यांचे प्रवचन ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य वासकर महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन, श्री गणेश संगीत भजनी मंडळ शिरोळ यांचे जागरभजन होणार आहे. शुक्रवार ५ जून रोजी समर्थ भजनी मंडळ शिरोळ यांचे भजन ह.भ.प. हणमंत मिसाळ (कर्नाळ) यांचे प्रवचन, ह.भ.प. श्रीगुरु ज्ञानेश्वर वासकर महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन एम.डी. जाधव भजनी मंडळ देसाई इंगळी यांचे जागरभजन होणार आहे.शनिवार ६ जून रोजी जनाई भजनी मंडळ कुटवाड यांचे भजन ह.भ.प. विक्रम बनकर (कनवाड) यांचे प्रवचन,ह.भ.प. श्रीगुरु विठ्ठलदादा वासकर महाराज यांचे कीर्तन, हनुमान भजनी मंडळ शिरटी यांचे जागर भजन होणार आहे.रविवार ७ जून रोजी ह.भ.प. कृष्णात पाटील (करोली टी) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी दिंडी सोहळा होणार आहे.या सोहळ्यात माऊलींच्या अश्वासह उभे व गोल रिंगण सोहळा पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे.या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. श्रीगुरु एकनाथआप्पा महाराज ( पंढरपूर) हे व्यासपीठ चालक म्हणून काम पाहणार आहेत. ह.भ.प. कृष्णात पाटील व ह.भ.प. प्रताप बनकर हे दररोजच्या काकड आरतीचे नियोजन करणार आहेत.या धार्मिक सोहळ्यात अनेक मान्यवरांनी अन्नदान केले आहे. अनेकांनी अर्थसाह्य केले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह नियोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, उपाध्यक्ष रमेश गावडे, खजिनदार रमाकांत संपकाळ, ऑडिटर बाळासाहेब कोळी (दिवाण), स्वागताध्यक्ष शिरोळभूषण दिलीपराव माने यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि वारकरी सांप्रदाय समस्त गावडे समाज विशेष परिश्रम घेत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!