शिरोळ / प्रतिनिधी
येथील बहुजन असंघटित कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष व
रिपब्लिकन कामगार सेनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ.शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात रक्त , नेत्र तपासणी बरोबरच कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.येथील बहुजन असंघटित कामगार संघटना कार्यालयात शिबिर झाले.आरोग्य विषयक उपक्रमात लाभार्थी कामगार सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांशी संबंधित समस्यांविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.रक्त तपासणीद्वारे रक्तदाब,शुगर, हिमोग्लोबिन तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. योग्य आहार,नियमित तपासणी आणि आरोग्याविषयी जागरूक राहून काळजी घेण्याबाबत डॉक्टरांनी सल्ला दिला. यावेळी महिला रुग्णांसाठी सोनोग्राफी तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.दरम्यान, बहुजन असंघटित कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.शंकरदादा माने यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना साडेसात लाख रुपयांपर्यंतच्या ग्रीन कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात वैद्यकीय सुविधासह शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.या कार्यक्रमास बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोषभाऊ वानखडे, रेश्मा संतोषभाऊ वानखडे, शेफाली कांबळे,सुप्रिया सावंत, दिशा नारंगीकर, भाग्यश्री बनसोडे, संपर्कप्रमुख सुनीलभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते.