शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी 

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अमर सिध्दराया स्वामी (वय ५५, रा. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक ३२/२०२३ भा.न्या.स.का. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. सिव्हील हॉस्पिटल, मिरज येथील सीएमओ डॉ. किरण हुलके यांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अमर स्वामी यांना दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत कोणतेही नातेवाईक अथवा ओळखीचे व्यक्ती नव्हते.उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर दिनांक ६ मे २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे नातेवाईक अथवा परिचित व्यक्तींचा कोणताही शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर व्यक्तीबाबत अथवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.यासाठी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२३०-२४६८०१८ उपलब्ध असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांचा मोबाईल क्रमांक ९४०५२४७५९७ तसेच तपासी अंमलदार एस. व्ही. पाखरे यांचा मोबाईल क्रमांक ८७८८३१९०९५ यावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध माध्यमातून माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!