पुलाची शिरोली येथील श्रीमती शालन पाटील यांचे निधन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी

पुलाची शिरोली येथील श्रीमती शालन शिवाजी पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या कै. शिवाजी रंगराव पाटील यांच्या पत्नी होत. तसेच अंक विक्रेता व एजंट संतोष पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार दि. २४ रोजी होणार आहे. शांत, मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे त्या परिसरात परिचित होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!