पुलाची शिरोलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसचा तीव्र निषेध

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  महिला नारीशक्ती वंदन आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यासाठी शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘धिक्कार असो’च्या घोषणा देत निषेध केला. हा निषेध … Read more

टाकळीवाडीचा सुपुत्र जवान रोहित खणीकुडे जम्मू काश्मीरमध्ये शहीद 

टाकळीवाडी / प्रतिनिधी  देशसेवेसाठी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना टाकळीवाडी गावचे सुपुत्र जवान रोहित परशुराम खणीकुडे शहीद झाल्याची हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्या शौर्याबद्दल अपार अभिमानही व्यक्त होत आहे. जवान रोहित खणीकुडे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते.देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांनी … Read more

घराघरात संविधान, मनामनात मूल्ये : कुरुंदवाडमध्ये १५० घरांत संविधान वाटप उपक्रम

शिरोळ / प्रतिनिधी भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, नागरिकांनी आपले हक्क, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या जाणून घ्याव्यात या उदात्त हेतूने नांदणी बँकेचे वसुली अधिकारी संजय शांताबाई भिमराव ढाले यांनी कौतुकास्पद उपक्रम राबवला. आपल्या आई दिवंगत शांताबाई ढाले यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी कुरुंदवाड परिसरात तब्बल १५० घरांमध्ये तसेच शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप केले.या … Read more

“शिरोळ शहर नशामुक्तसाठी रणशिंग फुंकले; तरुण पिढी वाचवण्यासाठी निर्णायक लढ्याची नगरसेवक सचिन शिंदे यांची हाक!”

शिरोळ / प्रतिनिधी  शहरात वाढत्या नशेच्या विळख्यामुळे तरुण पिढी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून याविरोधात आता निर्णायक आणि आक्रमक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सचिन शिंदे यांनी पुढाकार घेत शिरोळ शहर नशामुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ नगर परिषदेमध्ये सार्वजनिक मंडळे,शाळा,महाविद्यालये,पोलीस,डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि … Read more

दत्तवाड येथे पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या निवासस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

दत्तवाड / प्रतिनिधी  दत्तवाड (ता. शिरोळ) येथील जेष्ठ पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानवाला यावेळी अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार … Read more

पुलाची शिरोलीत तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची पोलिसांत नोंद

पुलाची शिरोली / प्रतिनिधी  पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) परिसरात एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सुभाष पाटील (वय ५५, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. रामनगर, शिरोली) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ही नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणातील मयताचे नाव सागर सुभाष … Read more

पुलाची शिरोली येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ५ ताब्यात

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे    पुलाची शिरोली ता हातकणंगले येथील माळवाडी परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ५ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख ४१०० रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले . हि कारवाई आज करण्यात आली .मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी-शिरोली येथील उमेश किसन सुर्यवंशी याच्या राहत्या घरी काही लोक … Read more

इंजि.नितीन शेट्टी यांची जितो टाऊन रिप्रेझेंटेटिव्हपदी निवड; शिरोळ परिसराच्या विकासाला मिळणार नवी चालना

शिरोळ / प्रतिनिधी  इंजि.नितीन शेट्टी यांची Jain International Trade Organization (जितो) या जैन समाजाच्या अग्रगण्य सामाजिक व व्यावसायिक संस्थेकडून शिरोळ व परिसरासाठी टाऊन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.श्री.शेट्टी हे सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे, समर्पित व कार्यक्षम … Read more

नागाव येथे महिलांनी मनुस्मृती प्रतिमेचे दहन करत डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागाव (ता. हातकणंगले) येथील समतानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महिलांसाठी के .के . भाऊजी होम मिनिस्टर कार्यक्रमादरम्यान महिलांच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महिलांनी एकत्र येत मनुस्मृती प्रतिमेचे दहन केले आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. याप्रसंगी … Read more

कोल्हापूर-सांगली महामार्गावर टँकरच्या धडकेत टेम्पो पलटी, तीन जण जखमी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर हालोंडी गावच्या हद्दीत आज दुपारी टँकर आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन तिघेजण जखमी झाले असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.१५ वाजण्यासुमार सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा टँकरचे क्रमांक (क्र. KA-32-AB-5374) देवगिरी पेट्रोल पंपसमोर आला असता,चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्ता ओलांडणाऱ्या स्वराज माजदा … Read more