पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
महिला नारीशक्ती वंदन आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यासाठी शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘धिक्कार असो’च्या घोषणा देत निषेध केला. हा निषेध आंदोलन भाजप प्रदेश उपाध्यक्ष गोकुळच्या संचालिका शोमिका यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत झालेल्या घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला होता. सरकारकडून संविधानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, जो आम्ही परतवून लावला, असे विधान गांधी यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेत, भाजप महिला आघाडीने हा महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा आणि विकासात अडथळा आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले यावेळी राहुल गांधींचा धिक्कार असो महिला विरोधी काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणांनी शिरोलीचा प्रवेशद्वार परिसर दणाणून गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असताना, राहुल गांधी संविधानाचे नाव घेऊन राजकारण करत आहेत असा आरोप यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेले महिला आरक्षण विधेयक राजकीय हेतूने रोखले गेल्याची भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना भाजप महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की राहुल गांधीनी देशातील कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांवर आणि त्यांच्या राजकीय अधिकारांवर आक्रमण केले आहे. महिलांना सक्षम करण्याच्या मार्गात काँग्रेस नेहमीच अडथळा ठरली आहे. शिरोलीतील महिला या कृतीचा जाहीर निषेध केला .यावेळी भाजपा महिला मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पूर्व अध्यक्ष पुष्पा पाटील , जिल्हा महिला मोर्चा ग्रामीण पूर्व चिटणीस आश्विनी पाटील , शिरोली लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे , मनीषा संकपाळ , नाझिया देसाई , वासिपा पटेल , भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस अंजुम जमादार , उपाध्यक्ष माधवी पाटील , आश्विनी पाटील , सीमा काटकर , भारती व्हनागडे , माजी सरपंच बिस्मिल्ला महात , मंगल कुंभार , प्रियांका पाटील , ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता प्रकाश पोवार सौ सविता जंगम , सौ. रागिनी यादव सर्व सीआरपी सर्व बचत गटाच्या महिला व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित महिला आशा वर्कर अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या