दत्तवाड येथे पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या निवासस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Spread the love
दत्तवाड / प्रतिनिधी 
दत्तवाड (ता. शिरोळ) येथील जेष्ठ पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानवाला यावेळी अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, सरपंच अनिता कडाके, उपसरपंच राखी कोळी, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण तसेच माजी सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.१४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यानिमित्त दत्तवाड गावातही ग्रामपंचायत, बौद्ध विहार आणि विविध सार्वजनिक ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रफिक मुल्ला, बाबुराव पवार, धन्यकुमार सिदनाळे, ॲड. सुरेश पाटील, ॲड. युवराज घोरपडे, अमित माने, भैया चौगुले, प्रमोद पाटील, बसगोंडा पाटील, लाला मांजरेकर, नितीन कांबळे, राजू कांबळे, तेजस वराळे, रवींद्र कांबळे, प्रशांत कांबळे, विद्याधर कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन समतेचा, बंधुत्वाचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला.गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!