“गाड्या आल्या..बाजूला व्हा…” शर्यतीच्या मैदानावर आबांच्या आठवणीला उजाळा

आबा म्हणजे… शिरोळ मधील एक प्रसिद्ध रांगड ग्रामीण भागातील शेतकरी पोशाख…विजार…तीन बटणे शर्ट…आणि डोकीवर पांढरी टोपी…आसं व्यक्तिमत्व माननीय श्री. पुंडलिक ज्ञानोबा कुरणे म्हणजेच आबा भाट होय.आबाचा  जन्म मुळातच शेतकरी कुटुंबातला… पारंपारिक  भाटकी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा…शेती निसर्गावरच अवलंबून असणारी…आबा ….शिरोळ आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध माणूस होय. त्याचे कारण म्हणजे आबाचा आवाज होय, आबाचा  करारीपणा आवाज ….सुस्पष्टता….. त्याला ग्रामीण भागाचा ढंग…यामुळे ते शिरोळच्या भव्य मोठ्याप्रमाणात भरणाऱ्या उरसातील कोणत्याही प्रकारच्या शर्यती असो व कुस्त्यांचे जंगी मैदान असो….. किंवा कोणताही करमणुकीचा कार्यक्रम असो…या सर्वांचे निवेदक म्हणून आबाचा  आवाज घुमायचा…आणि सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा म्हणजे घ्यायचाच….आबाला  सांस्कृतिक,क्रीडा,शर्यती या क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा भरपूर आवड असायची आबा या कार्यक्रमांना आवर्जून अगदी शेवटपर्यंत उपस्थित राहायचे आबा म्हणजे गावातली सर्व तरुण मंडळांच्या तरुणांचे गळ्यातील ताईत होते.आबा खरोखर मनमिळावू माणूस सगळ्यांना सांभाळून घेणारा प्रसंगावधान साधून लगेचच यावर तोडगा काढणारा शिरोळच्या उरूसात आबाचाआवाज जर ऐकायला मिळाला नाही तर उरूस असल्याचं वाटायचं नाही.इतका तो आवाज आमच्या कान वळणी पडलेला होता.दरम्यान आबाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली,आबाला शुगर असल्याने पायाचे दुखणे बरे झाले नाही.यामुळे ते गेली सहा महिने घरातच बसून राहिले.त्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा धक्का आला.आणि आबा गेले बातमी कानावर आली आणि शहरात सुन्न करणारी शांतता पसरली.शिरोळ मधील ते सर्वांचेच लाडके होते असा माणूस परत होणे नाही, त्यांचा आवाज अजूनही आमच्या कानात घुमतोय…..” गाड्या आल्या..बाजूला व्हा…”अशा या बहुआयामी…. बहुरंगी साध्या आणि सरळ व्यक्तिमत्व म्हणजे कै. पुंडलिक ऊर्फ आबा ज्ञानोबा कुरणे भाट आणि गुरुवर्य श्री द. आ. माने ( गुरुजी) हे जरी आज आपल्यात नसले तरी या दोन महान हस्ती यांच्या महान योगदानामुळे  शिरोळकरांच्या कायम स्मरणात व आठवणीत राहतील.
Spread the love
error: Content is protected !!