श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिन च्या जयघोषात मानाचा गलिफ अर्पण

शिरोळ / प्रतिनिधी 

श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या अखंड जयघोषात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी श्री बुवाफन महाराज समाधीस्थळी उत्सव व उरुस संयोजन समिती आणि शिरोळ नगर परिषदेच्या वतीने मानाचा गलिफ व नैवेद्य अर्पण करण्यात आला. शोभेच्या दारूची आतिषबाजी पारंपारिक वाद्याच्या गजरात मानाच्या गलिफाची शाही मिरवणूक काढण्यात आली.सोमवारपासून श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसास प्रारंभ झाला.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच स्पर्धा, शर्यती,मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस यामुळे मंदिरात दिवसभर गलिफ नैवेद्य नारळाचे तोरण व आगर बत्ती उद कापूर अर्पण करण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी होती.लाखो भाविकांनी श्री बुवाफन महाराज समाधी स्थळ व श्री शंभूआप्पा महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समिती व शिरोळ नगर परिषदेच्यावतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात मानाच्या गलिफाची शहरातील प्रमुख मार्गावरून शाही मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकी दरम्यान आकर्षक शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली.श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील,बिग बॉस फेम धनंजय पवार (डी.पी.),युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड,दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे,गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख,शिवाजी जाधव सांगले,माजी सरपंच गजानन संकपाळ, धनाजी पाटील नरदेकर,रावसाहेब देसाई,माजी नगरसेवक पंडित काळे,श्रीवर्धन माने देशमुख,प्रकाश गावडे शरद उर्फ बापू मोरे,बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने-देशमुख,बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, दिगंबर जाधव,राहुल यादव,दीपक भाट,अवधूत उर्फ बाबाजी पाटील,चंद्रकांत भाट,मोहन यादव,अनिल काळे,धनाजी गावडे,सुभाष भाट,दत्तात्रय बाबर, प्रशांत माने चुडमुंगे, उत्तम भाट,लालास गावडे,उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी,कार्याध्यक्ष महेश काळे,बरोबर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराज की जय,श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या अखंड जयघोषात श्री बुवफन महाराज समाधीस्थळी मानाचा गलिफ व नैवेद्य अर्पण करण्यात आला.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,अध्यक्ष केतन चव्हाण उपाध्यक्ष संकेत कोळी कार्याध्यक्ष महेश काळे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते उत्सव व उरूस साजरा करण्याकरिता विशेष परिश्रम घेत आहेत.

Spread the love
error: Content is protected !!